मोठी बातमी! मराठवाड्यात भूकंपाचे धक्के; परभणी, नांदेड आणि हिंगोली हादरले

मोठी बातमी! मराठवाड्यात भूकंपाचे धक्के; परभणी, नांदेड आणि हिंगोली हादरले

नांदेड: मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. 10 जुलैच्या पहाटे भूकंप झाल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याच सोबत विदर्भातील वाशिम जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपमुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

परभणी जिल्ह्यात सकाळी 7:15 वाजता भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे. परभणी शहर तसेच सेलू, गंगाखेड व इतर ग्रामीण भागांमध्ये भूकंपाचा हा धक्का जाणवला. मिळालेल्या माहितीनुसार हा धक्का 4.2 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता. हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले.

वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सात वाजून 14 मिनिटांनी दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. नांदेड तसेच जालना जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के बसले आहेत. नांदेड जिल्ह्यात सकाळी 7.15 वाजता हे धक्के जाणवले. तर जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *