मलायका अरोराच्या वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल, इमारतीवरुन उडी मारत दिला जीव

मलायका अरोराच्या वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल, इमारतीवरुन उडी मारत दिला जीव

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा यांचे वडील अनिल अरोरा यांनी उंच इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस अलायी आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच अभिनेता अरबाज खान सध्या अरोरा कुटुंबियांसोबत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईच्या वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आत्महत्येमागील ठोस कारण समोर आले नाही.

अभिनेत्री मलायका अरोरा ही काही कामानिमित्ताने पुण्यात होती. या घटनेची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईसाठी रवाना झाली. या घटनेची माहिती मिळताच अरोरा कुटुंबातील सदस्यांना धीर देण्यासाठी मलायकाचा पूर्व पती आणि अभिनेता अरबाज खान हा अरोरा यांच्या घरी दाखल झाला.

मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांचे कुटुंब भारताच्या सीमेवर वसलेल्या फाजिल्का येथील रहिवासी होते. अनिल अरोरा यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केले होते. अनिल अरोरा यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्पशी लग्न केले. मलायका 11 वर्षांची असताना अनिल अरोरा आणि जॉयस यांचा घटस्फोट झाला असल्याचे मलायकाने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *